मुंबई : काँग्रेस नेते बाबा सिद्दीकींची 462 कोटींची संपत्ती ईडीकडून जप्त
Continues below advertisement
काँग्रेस नेते आणि माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांना एसआरए घोटाळ्यात ईडीने दणका दिला आहे. सिद्दीकींची मुंबईतील तब्बल 462 कोटींची संपत्ती अंमलबजावणी संचालनालयाने जप्त केली आहे. वांद्रे पश्चिममध्ये बाबा सिद्दीकी यांच्या 'पिरॅमिड डेव्हलपर्स' या कंपनीच्या नावे 33 फ्लॅट्स होते.
वांद्र्यातील एसआरए योजनेतील घोटाळ्याच्या आरोपांचा तपास करताना पीएमएलए कायद्यांतर्गत ही कारवाई करण्यात आली. चारशे कोटींच्या एसआरए योजनेच्या कागदपत्रांमध्ये फेरफार करुन कोट्यवधींचा घोटाळा केल्याचा आरोप बाबा सिद्दीकींवर आहे.