मुंबई : सुनावणीला कोकण आयुक्त अनुपस्थित, मनसेतून शिवसेनेत आलेल्या नगरसेवकांना दिलासा
Continues below advertisement
मनसेतून शिवसेनेत दाखल झालेल्या 6 नगरसेवकांना तूर्तास दिलासा मिळाला आहे. कारण कोकणचे आयुक्त जगदीश पाटील गैरहजर राहिल्यामुळे ही सुनावणी पुढे ढकलली आहे. यानंतर आता मनसे आक्रमक झाली आहे. कोकण आयुक्त हे मुख्यमंत्र्यांच्या हातचं बाहुलं आहे. अशा शब्दात मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी टीका केली आहे. मनसेतून दिलीप लांडेंच्या नेतृत्वात सहा नगरसेवक शिवसेनेत दाखल झालेत. त्याला मनसेनं कोकण आयुक्तांकडे आव्हान दिलं आहे. याप्रकरणाची निकाल तीन महिन्यात येणं अपेक्षित होतं. मात्र चार महिन्यानंतरही निकाल आला नाही. सातत्यानं आयुक्त गैरहजर राहत असल्यामुळे त्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होतं आहे.
Continues below advertisement