मुंबई : मनसेची साथ सोडणाऱ्या 6 नगरसेवकांचा आज फैसला
Continues below advertisement
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतून शिवसेनेत प्रवेश केलेल्या सहा नगरसेवकांचा आज फैसला होणार आहे. कोकण आयुक्त या संदर्भात निकाल देतील. शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर मनसेनं या नगरसेवकांवर पक्षांतरबंदी कायद्याअंतर्गत कारवाई करण्याची मागणी केली आहे. तर या सहा नगरसेवकांनी कोकण आयुक्तांकडे वेगळ्या गटांची मागणी केली आहे. मात्र, गेल्या तीन महिन्यांपासून हे प्रकरण प्रलंबित आहे. दरम्यान, कोकण आयुक्तांचा निर्णय काय येतो त्यावर पुढची गणितं अवलंबून असणार आहेत.
Continues below advertisement