मुंबई : असा असेल श्रीदेवींचा अंतिम प्रवास
श्रीदेवी यांच्या पार्थिवावर दुपारी साडेतीन वाजता पार्ल्यातल्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत. सेलिब्रेशन हाऊसमधून निघून ही अंतयात्रा कोकीळाबेन रुग्णालय, जुहू पोलीस स्टेशन मार्गे पार्ल्यातल्या स्मशनानभूमीत दाखल होईल. या संपूर्ण मार्गावर पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.