मुंबई : श्रीदेवींच्या अंत्यदर्शनासाठी देशभरातून चाहत्यांची मोठी गर्दी

Continues below advertisement
बॉलिवूडची पहिली सुपरस्टार अशी ख्याती मिरवणाऱ्या श्रीदेवीला निरोप देण्यासाठी मुंबईत देशभरातील चाहत्यांनी गर्दी केली आहे. अगदी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यासह, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूतून चाहते मुंबईत पोहोचले आहेत. अंधेरीच्या सेलिब्रेशन क्लबमध्ये श्रीदेवी यांचं पार्थिव अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आलंय. त्यानंतर दुपारी साडेतीन वाजता पार्ल्याच्या स्मशानभूमीत श्रीदेवी यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येतील. साडेचार किलोमीटरच्या या प्रवासादरम्यान पोलिस आणि एसआरपीएफनं कडेकोट बंदोबस्त तैनात केला. काल रात्री म्हणजे तब्बल 72 तासानंतर श्रीदेवी यांचं पार्थिव दुबईहून मुंबईत आणण्यात आलं. त्यानंतर श्रीदेवी यांच्या अंतिम दर्शनासाठी दिग्गज नेत्यांसह, अख्खं बॉलिवूड आणि टॉलिवूडही लोटल्याचं दिसतं.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram