मुंबई : भाजपला कोंडीत पकडण्यासाठी उद्धव ठाकरेंचा अयोध्या दौरा
Continues below advertisement
हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन शिवसेनेने पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्याच पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अयोध्या आणि वाराणसीचा दौरा आखला आहे. शिवसेनेने मुंबईत विविध ठिकाणी उद्धव ठाकरेंच्या या दौऱ्याचे पोस्टर्स लावले आहेत. ‘चलो आयोध्या, चलो वाराणसी, देशाच्या राजकारणातील महत्त्वकांक्षी पाऊल’ असं या पोस्टर्सवर लिहिण्यात आलं आहे. या पोस्टर्सवर शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांचाही फोटो झळकत आहे.
Continues below advertisement