मुंबई : लोअर परेल पुलावर शिवसेना-मनसे कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा

Continues below advertisement
मुंबईतील लोअर परेलमध्ये असलेल्या उड्डाणपुलावर शिवसेना आणि मनसेचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले. आपल्या पाहणी दौऱ्यात मनसे कार्यकर्त्यांनी घुसखोरी केल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. पोलिसांनी मध्यस्थी करुन हे प्रकरण वेळीच शांत केलं. वरळी भागातील शिवसेना आमदार सुनिल शिंदे आणि मनसेचे माजी नगरसेवक संतोष धुरी लोअर परेलच्या उड्डाणपुलावर गेले होते. त्यावेळी दोघांच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांना धक्काबुक्की-शिवीगाळ केल्याची माहिती आहे. त्यानंतर उड्डाणपुलावरच शिवसेना आणि मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा झाला.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram