मुंबई : शिवसेनेचे माजी नगरसेवक अशोक सावंत यांची हत्या
Continues below advertisement
मुंबईतल्या कांदिवलीतील शिवसेनेचे माजी नगरसेवर अशोक सावंत यांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. रविवारी रात्री 11 वाजता अशोक सावंत आपल्या घरी जात असताना बाईक वरून येणाऱ्या काही अज्ञातांनी त्यांच्यावर धारधार शस्त्रांनी हल्ला केला. त्यानंतर सावंत यांना तातडीनं रूग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र तिथे त्यांना मृत घोषित करण्यात आलं. दरम्यान पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला असून हल्लेखोरांचा तपास करत आहेत.
Continues below advertisement