मुंबई : भाजप लोकप्रतिनिधींच्या मतदारसंघातील खड्ड्यांविरोधात शिवसेनेचे आंदोलन

Continues below advertisement
मुंबईतले खड्डे शिवसेनेची की आहेत की भाजपचे हा प्रश्न पडला आहे. काऱण खड्ड्यावरुन सत्ताधारी शिवसेनेनं आंदोलन केलंय
रस्त्यावरच्या खड्ड्यांविरोधात शिवसेनाच रस्त्यावर उतरली आहे. सांताक्रूझमधल्या सानेगुरुजी विद्यामंदिर या शाळेबाहेर भल्या मोठ्या खड्ड्यांशेजारीच शिवसेनेने विद्यार्थ्यांचा एक चित्रकला उपक्रम घेतला. या विद्यार्थ्यांनी मुंबईतल्या खड्ड्यांची चित्रं काढली आणि त्यावर बीएमसीचं नावही लिहिलं. पण, हे खड्डे आमचे नाहीच हे खड्डे तर भाजपचे असा अजब दावा शिवसेनेने केला. भाजपचे लोकप्रतिनीधी ज्या भागांमध्ये आहेत तिथेच खड्डे आहेत आणि शिवसेनेवर आरोप करण्यासाठी ते जाणीवपूर्वक बुजवले जात नाहीत असा आरोपही शिवसेनेने केला आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram