मुंबई : मिठागराच्या काही भागात घरं बांधण्यास परवानगी?
Continues below advertisement
केंद्रीय पर्यावरण खात्याने मिठागराचा काही भाग घरांच्या बांधकामासाठी वापरण्याचा निर्णय घेण्याचे संकेत दिले आहेत. मात्र याला शिवसेनेनं ठाम विरोध सुरु केलाय. ULC कायदा रद्द झाल्यानंतर त्या जागेवर घरं बनवण्याच्या योजनेची अंमलबजावणी झालीय का, याबाबत आधी मुख्यमंत्र्यांनी अभ्यास करावा असं पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी म्हटलं आहे. मुंबईला मोकळा श्वास घेण्याची गरज आहे. त्यामुळे आता समुद्र ही घशात घालणार का? असाही प्रश्नही राज्याचे पर्यावण मंत्री रामदास कदम यांनी केला आहे.
Continues below advertisement