मुंबई : आदित्य ठाकरे शिवसेनेच्या नेतेपदी, मिलिंद नार्वेकर सचिव
Continues below advertisement
2019 च्या निवडणुकांआधीच शिवसेना एनडीएला रामराम करणार असल्याची घोषणा उद्धव ठाकरेंनी केली आहे. इतकंच नाही तर लोकसभा आणि विधानसभा निवडणुका शिवसेना स्वबळावर लढेल, असा ठरावही शिवसेनेने मुंबईत झालेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीत पारीत केला आहे. याच बैठकीत युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे, एकनाथ शिंदे, चंद्रकांत खैरे, अनंत गीते, आनंदराव अडसूळ यांची नेतेपदी निवड झाली. तर मिलिंद नार्वेकर यांना सचिव म्हणून नियुक्त करण्यात आलंय.
Continues below advertisement