VIDEO | संसदेचं अधिवेशन सुरु असताना शिवसेना खासदारांची मातोश्रीवर बैठक | मुंबई | एबीपी माझा

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्यातल्या शिवसेनेच्या सगळ्या खासदारांना एकाचवेळी मुंबईमध्ये बोलावणं धाडलंय... आज सकाळी ११ वाजता सेना खासदारांची बैठक मातोश्रीवर बोलावण्यात आलीय. त्यामुळे युतीबाबतचा एखादा मोठा निर्णय घेतला जाणार का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.
एकीकडे दिल्लीत संसदेचं अधिवेशन सुरु आहे आणि असं असतानाही सगळे खासदार महाराष्ट्रात परतल्यानं भुवया उंचावल्या आहेत, तर,दुपारी 4 वाजता शिवसेनेच्या कोअर कमिटीची बैठकही बोलावण्यात आलीय.
दरम्यान शिवसेनेसोबत युती करण्यासाठी भाजपनं एक पाऊल मागे टाकण्याची तयारी केलीय. कारण लोकसभेला गेल्या वेळीपेक्षा शिवसेनेला एक जागा जास्त देणार असल्याची माहिती सुत्रांनी दिलीय. नव्या फॉर्म्युल्यानुसार लोकसभेसाठी भाजप-शिवसेना 25-23 जागा लढवण्याचे संकेत आहेत.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola