मुंबई : नाणार प्रकल्पावरुन शिवसेना-भाजपमध्ये जुंपण्याची चिन्ह
Continues below advertisement
मस्ती आली असेल तर नाणार प्रकल्प रेटून दाखवाच, असा इशारा उद्धव ठाकरेंनी सरकारला दिला आहे. त्यामुळे आज होणाऱ्या कॅबिनेट बैठकीत सेना-भाजप नेत्यांमध्ये खडाजंगी होण्याचे संकेत आहेत. काल नाणार प्रकल्पातील भूसंपादनाची अधिसूचना रद्द केल्याची घोषणा उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केली. मात्र त्यानंतर लागलीच भूसंपादनाची अधिसूचना रद्द करण्याचा अधिकार कुठल्याही मंत्र्याला नसल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे शिवसेना पुन्हा एकदा तोंडघशी पडली. कोकणात होणाऱ्या नाणार रिफायनरी प्रकल्पाला स्थानिकांचा मोठा विरोध आहे. त्यामुळे शिवसेनेनं या प्रकल्पाला जोरदार विरोध केला आहे.
Continues below advertisement