मुंबई | शिवसेना नगरसेवक अनिल कोकीळ यांच्याकडून नियम पायदळी, विनाहेल्मेट बुलेटवारी
शिवसेना नगरसेवक आणि बेस्टचे माजी अध्यक्ष अनिल कोकीळ यांनी वाहतुकीचे नियम पायदळी तुडवल्याचं समोर आलंय. कोकीळ यांनी विनाहेल्मेट बुलेटवारी करत फेसबुकवर लाईव्ह पोस्ट टाकली आहे. परळ ते काळाचौकी दरम्यान त्यांनी विनाहेल्मट बुलेटवारी केल्याचं बोललं जातंय. त्यामुळे त्यांना पाहून हेल्मेट कुठेय अशी चर्चा होताना दिसत आहे. अपघातादरम्यान होणार मृत्यूचा धोका टाळण्यासाठी वाहतूक पोलीस वाहतूक विभागाकडून जनजागृती केली जाते. विनाहेल्मेट प्रवास करण्यास दंड देखील आकारला जातो. त्यामुळे सर्वसामांन्याकडून दंड आकारणारं वाहतूक विभाग शिवसेना नगरसेवक अनिल कोकीळ यांच्याकडून दंड आकारणार का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.