मुंबई : शिवसेना कर्नाटक विधानसभेच्या 50 ते 55 जागा लढवणार : संजय राऊत

Continues below advertisement
गोवा आणि उत्तर प्रदेश पाठोपाठ शिवसेना कर्नाटक विधानसभा निवडणुकांच्या रिंगणात उतरणार आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी यासंदर्भात घोषणा केली. महाराष्ट्र एकीकरण समितीला शिवसेना पाठिंबा देणार आहे.

कर्नाटकात शिवसेना 50 ते 55 जागा लढवणार आहे. शिवसेनेने फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात लोकसभा निवडणुका स्वबळावर लढवण्याचा निर्धार व्यक्त केला होता.

सीमा भागात राष्ट्रवादी काँग्रेस निवडणुका लढणार नाही, सीमा भागात इतर पक्षांनीही निवडणुका लढवू नयेत. जोपर्यंत सीमा भागाचा निकाल लागत नाही, तोपर्यंत केंद्रशासन करावं, अशी मागणी राऊत यांनी केली.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram