ABP News

मुंबई : मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिवसेनेचा नाणार प्रकल्प कराराचा निषेध

Continues below advertisement
नाणार प्रकरणावरुन शिवसेना-भाजप यांच्यातील मतभेद पुन्हा एकदा समोर आले आहेत. आज मंत्रिमंडळाची बैठक आयोजित करण्यात आली होती, या बैठकीत नाणार प्रकल्पाचे पडसाद उमटले. मंत्रिमंडळाच्या या बैठकीत शिवसेनेच्या मंत्र्यांनी नाणार प्रकल्पाबाबत निषेध नोंदवला. राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई मात्र या बैठकीला गैरहजर होते. शिवसेनेचा नाणार प्रकल्पाविरोधातील आक्रमक पवित्रा पाहून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्यासोबत उद्या बैठक बोलावली आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram