Flood Help | पूरग्रस्तांच्या मदतीसाठी शिवसेनेची पहिली पाच शिवसहाय्य पथकं रवाना | ABP Majha
Continues below advertisement
सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातल्या पूरग्रस्तांच्या मदतीसाठी शिवसेनेची पहिली पाच शिवसहाय्य पथकं रवाना झाली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या उपस्थितीत या पथकांना निरोप देण्यात आला. या पथकांमध्ये डॉक्टर्स आणि त्यांच्या मदतनिसांसह रुग्णवाहिकाही आहेत. या पथकासोबत पूरग्रस्तांसाठी औषधं, धान्य. दैनंदिन गरजेच्या वस्तू, चादरी, ब्लॅन्केट आणि चांगले कपडेही पाठवण्यात आले आहेत. शिवसेनेची ही पहिली पाच पथकं महाड, वाई, पाटण आणि कराडमध्ये जाणार आहेत.
Continues below advertisement