शिर्डी : मुंबईहून शिर्डी अवघ्या 40 मिनिटांत, आज पहिली चाचणी
बहुप्रतिक्षित मुंबई ते शिर्डी विमानसेवेची आज पहिली चाचणी होणार आहे. य़ामुळे मुंबई ते शिर्डी हे अंतर अवघ्या 40 मिनिटात पार करता येणार आहे. आज दुपारी 3 वाजून 20 मिनिटांनी मुंबईहून शिर्डीसाठी विमान उड्डाण करेल. ज्यात पालकमंत्री राम शिंदेसह तज्ज्ञांचं एक पथक असणार आहे. हे विमान शिर्डीत दाखल झाल्यानंतर तिथल्या धावपट्टीची पाहणी करेल. त्यानंतर 1 ऑक्टोबरला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते विमानतळाचं लोकार्पण केलं जाणार जाईल.