मुंबई-शिर्डी विमानसेवेची यशस्वी चाचणी, 1 ऑक्टोबरला राष्ट्रपतींच्या हस्ते लोकार्पण
Continues below advertisement
आता देशभरातल्या भाविकांना साईबाबांचं दर्शन घेण्यासाठी काही तासांत शिर्डी गाठणं शक्य होणार आहे. काल शिर्डी विमानतळावर चाचणीसाठी मुंबईहून उड्डाण घेतेलेल्या विमानतळाचं यशस्वी लँडिंग झालं. दुपारी चारच्या सुमारास मुंबईच्या विमानतळाहून विमानानं शिर्डीसाठी उड्डाण घेतलं. साधारण चाळीस मिनिटांच्या कालावधीत विमान शिर्डीत दाखल झालं. विमानात अहमदनगरचे पालकमंत्री राम शिंदेंसह तज्ज्ञांच पथक होतं. शिर्डी विमानतळाच्या धावपट्टीची पाहणी केल्यानंतर 1 ऑक्टोबरला राष्ट्रपतींच्या हस्ते विमानतळाचं लोकार्पण करण्यात येईल.
Continues below advertisement