
मुंबई : आयआयटी मुंबईमध्ये विद्यार्थ्यांचा लैेगिक छळ, तक्रार दाखल करुनही कारवाई नाही
Continues below advertisement
मुंबई आयआयटी कँपसमध्ये लैंगिक छळ झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अंतिम वर्षात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांनी आपल्या ज्युनिअर विद्यार्थ्यांचा छळ केल्याचं सांगण्यात येत आहे. आयआयटीचे डीन सौम्य मुखर्जी यांनी ह्या विद्यार्थ्याला 'मूड इंडिगो' फेस्टिवल वेळी मेंटॉर म्हणून नियुक्त केलं होतं. काही पीडित विद्यार्थ्यांनी आयआयटी मुंबईच्या डिसिप्लिनरी ऍक्शन कमिटीकडे याबाबत तक्रार केली. ह्या तक्रारी नंतर चार पाच महिने होऊन सुद्धा या विद्यार्थ्यावर कोणतीही कारवाई आयआयटी मुंबई कडून करण्यात आली नाही.
Continues below advertisement