मुंबई : ज्येष्ठ साहित्यिक आणि पत्रकार अरुण साधू यांचं निधन, गिरीश कुबेर यांची प्रतिक्रिया
साहित्य आणि पत्रकारिता अशा दोन्ही क्षेत्रांवर आपली मोहोर उमटविणारे ज्येष्ठ साहित्यिक आणि पत्रकार अरुण साधू यांचं आज पहाटे 4.30 च्या सुमारास निधन झालं. साधू यांनी देहदान केलं असल्यानं त्यांच्यावर कोणतेही विधी होणार नाही आहेत.
काल रविवारी सकाळी प्रकृती बिघडल्यानं साधू यांना सायन रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांना हृदयविकाराचा त्रास असल्याने अतिदक्षता विभागात ठेवण्यात आल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.