मुंबई : महापौरांच्या निवासस्थानावरुन शिवसेना-भाजपमध्ये वादाची ठिणगी
Continues below advertisement
मुंबई महापौरांच्या बंगल्यावरुन पुन्हा शिवसेना आणि भाजप आमनेसामने आलेत...वाद सुरू झालाय महापौरांच्या निवासस्थानावरून. सध्या दादरच्या महापौर बंगल्यात मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर राहतात पण ही जागा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकासाठी प्रस्तावीत आहे. आता महोपौरांच्या निवासासाठी मलबार हिलमधला जलविभागाचा बंगला आपल्याला देण्य़ात यावी अशी मागणी विश्वनाथ महाडेश्वरांनी केलीये...मात्र सध्या हा बंगला MMRDA चे अतिरिक्त सचिव आणि मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय प्रवीण दराडेंच्या ताब्यात आहे...त्यामुळे महापालिकेनं दराडेंना नोटीस पाठवलीये...मात्र सामान्य प्रशासनानं दराडेंना कुठलीही नोटीस पाठवू नये असं पत्र महापालिकेला लिहिलंय.....मात्र हे पत्र आपल्य़ापासून लपवून ठेवल्याचा आरोप महापौरांनी केलाय...
Continues below advertisement