मुंबई : कुर्ला स्टेशन परिसरात संरक्षक भिंत कोसळली, चौघे जखमी
कुर्ला रेल्वे स्टेशन परिसरात एक संरक्षक भिंत कोसळलीय... त्यात 4 जण जखमी झाल्याची माहिती आहे... आज सकाळी 10च्या सुमारास ही घटना कुर्ला पश्चिमेला घडलीय... त्यात 2 दुचाकींचंही नुकसान झालंय... मात्र, रेल्वे वाहतुकीवरही कुठलाही परिणाम झालेला नाही... कुर्ल्याच्या भाभा रुग्णालयात जखमींवर उपचार करण्यात येत आहेत... चौघांपैकी एकाच्या डोक्याला मार लागलाय तर एकाचा पाय फ्रॅक्चर झाल्याची माहिती आहे