मुंबई : गिरगाव चौपाटीवर सीप्लेनचं यशस्वी प्रात्यक्षिक
Continues below advertisement
मुंबई विमानतळावरून उड्डाण केलेलं सीप्लेन आज पहिल्यांदाच गिरगाव चौपाटीवर उतरलं. गिरगाव चौपाटीवर झालेलं हे सीप्लेनचं पहिलंच प्रात्यक्षिक आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, गजपती राजू हे उपस्थित होते. 10 ते 14 सीटर असणारं हे सीप्लेन जमीन आणि पाणी अशा दोन्ही ठिकाणी लॅण्डिंग करु शकतं. यासाठी स्पाईसजेटनं तब्बल 100 सीप्लेन घेणार असल्याची घोषणा केली आहे.
Continues below advertisement