मुंबई : 1 एप्रिलपासून वरळी-सी लिंक टोल वाढणार

Continues below advertisement
मुंबईकरांना एक एप्रिलपासून वांद्रे- वरळी सी-लिंकसाठी जास्तीचा टोला द्यावा लागण्याची शक्यता आहे. सुत्रांच्या माहितीनुसार, सीलिंकवर अपेक्षेपेक्षा वाहनं कमी असल्यानं ही टोलवाढ केली जात आहे. टाईम्स ऑफ इंडियाने यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे. कार आणि एसयूव्ही गाड्यांना आधी 60 रुपये टोल होता तो आता 70 रुपये होवू शकतो. तर रिर्टनसाठी 90 रुपयांवरुन 105 रुपये इतका टोल भरावा द्यावा लागेल. तर पासधारकांना तीन हजाराच्याऐवजी आता 3500 रुपये भरावे लागतील. 2009 पासून आतापर्यंत सीलिंक टोलमधून 692 कोटी रुपये वसूल करण्यात आले आहेत. तसंच सी-फेसवरच्या टोलनाक्याची वसुलीची मुदत ही आधी 2039 सालापर्यंत होती ती 2052 सालापर्यंत करण्यात आली आहे. त्यामुळे आता नागरिकांना नाहाक याचा त्रास सहन करावा लागणार आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram