मुंबई : 30 एप्रिलपर्यंत शाळा सुरु ठेवण्याचा निर्णय मागे, विनोद तावडेंची घोषणा
Continues below advertisement
३० एप्रिलपर्यंत राज्यातील शाळा सुरु ठेवण्याचा निर्णय शिक्षण विभागानं रद्द केला आहे. एप्रिलमध्ये परीक्षा संपल्यानंतर पुढे १ महिना शाळांमध्ये उन्हाळी शिबीर राबवण्यात यावं असं फार्मान शिक्षण विभागानं काढलं होतं. मात्र याला शिक्षकांसह पालकांनीही विरोध केला. या विरोधानंतर आता हा निर्णय मागं घेण्यात आला आहे. शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी विधानपरिषदेत ही माहिती दिली. केंद्र सरकारच्या निर्देशाप्रमाणं राज्यात ही योजना राबवली जात होती. मात्र, अधिकाऱ्यांकडून खूप उशिरा हा निर्णय घोषित करण्यात आला, त्यामुळं हा निर्णय रद्द करण्यात येत असल्याचं शिक्षणमंत्री म्हणाले. मात्र, पुढील वर्षी हा निर्णय राबवण्यात येईल हेही त्यांनी स्पष्ट केलं.
Continues below advertisement