मुंबई : मनोरा आमदार निवासमध्ये कोट्यवधींचा घोटाळा?
मुंबईतील मनोरा आमदार निवासामध्ये कोट्यवधींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप भाजपचे आमदार चरण वाघमारे यांनी केला आहे. मनोरा आमदार निवासाचं निकृष्ट दर्जाचं बांधकाम हे अधिकारी आणि कंत्राटदारांच्या संगनमतानं झाल्याचं वाघमारे यांनी म्हटलं आहे. हाच भ्रष्टाचार दडपण्यासाठी आमदार निवास पाडणार असल्याची भीती दाखवून रिकामा करण्याचा घाट अधिकाऱ्यांकडून घातला जात असल्याचं आमदार वाघमारे म्हणाले.