मुंबई : SBI, PNB आणि ICICI बँकांच्या कर्जावरील व्याज दरांमध्ये वाढ

Continues below advertisement
भारतातील तीन मोठ्या बँकांनी कर्जावरील व्याजदरात वाढ केली आहे. यात भारतीय स्टेट बँक, पंजाब नॅशनल बँक आणि आयसीआयसीआय बँकेचा समावेश आहे. एसबीआयने एमसीएलआर पाव टक्क्यांनी वाढवले असून, पीएनबीने 20 बेसिस पॉईंटची (100 बेसिस पॉईंट म्हणजे एक टक्के) वाढ केली आहे. नवे व्याज दर एक मार्चपासून लागू होतील.

कर्जावरील व्याजदर एमसीएलआरवर म्हणजेच मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड बेस्ड लेंडिंग रेटवर आधारित ठरवले जाते. ही पद्धत एप्रिल 2016 पासून सुरु करण्यात आली आहे. एसीएलआरवर बँक आपापलं मार्जिन जोडून, कर्जावरील व्याजदर ठरवते. एप्रिल 2016 आधीपर्यंत बेस रेटवर आधारित कर्ज दिले जात असे. मात्र आता एमसीएलआरवर आधारितच कर्ज दिले जाते.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram