नाशिक : सतीश चिखलीकर लाचप्रकरणाची मूळ फाईल कोर्टातून गायब
Continues below advertisement
नाशिकसह महाराष्ट्रात खळबळ उडवून देणाऱ्या सतीश चिखलीकर लाचखोरी प्रकरणाला आता एक वेगळंच वळण मिळालं आहे. चिखलीकर लाचप्रकरणातील खटल्याची मूळ तक्रार फाईलच जिल्हा सत्र न्यायालयातून संशयास्पदरित्या गहाळ झाली आहे. त्याजागी कोणत्याही साक्षीदार किंवा तक्रारदाराची सही नसलेली बनावट तक्रार कागदपात्रांमध्ये दाखल झाली आहे. त्यातील काही मजकूरही बदलल्याचं समोर आलं आहे. याप्रकरणाची जिल्हा न्यायालयानेही गंभीर दखल घेतली असून, सरकारवाडा पोलिस ठाण्यात न्यायालयाकडून निबंधकाने फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
Continues below advertisement