मुंबई : खड्डे भरण्याची डेडलाईन संपली, पालिकेची तारेवरची कसरत
Continues below advertisement
अनेक अल्टिमेटम आल्या... अनेक डेडलाईन्स मिळाल्या... अनेक आंदोलनं झाली...पण मुंबईकरांच्या नशिबात बिना खड्ड्यांचे रस्ते बघणं आहे की नाही हे देवाला ठाऊक... याचं कारणं मुंबईच्या रस्त्यांवरचे खड्डे 48 तासात भरले जातील असा खणखणीत दावा करणाऱ्या मुंबई महापालिकेची ड़ेडलाईन संपत आलीए.. खड्डे भरण्यासाठी पालिकेकडे आता अवघे काही तास शिल्लक राहिलेत... कमी वेळ आणि खड्ड्यांमुळे अक्षरशः चाळण झालेले रस्ते दुरुस्त करताना पालिकेला घाम फुटलाय....त्यामुळे आता पालिकेनं दिलेल्या डेडलाईनमध्ये मुंबईकरांना खड्डेमुक्त रस्ते पाहायला मिळणार की ये रे माझ्या मागल्या तेच पाहावं लागेल
Continues below advertisement