मुंबई: एका रात्रीत पालघरमध्ये 7 टक्के मतं कशी वाढली? शिवसेनेचा सवाल

Continues below advertisement
पालघरमध्ये निवडणूक अधिकाऱ्यांनी एका रात्रीत 6.72 टक्के मतं वाढवून सांगितल्याचा गंभीर आरोप शिवसेनेनं केलाय. सामनात त्याबाबतचं वृत्त प्रसिद्ध करण्यात आलंय.
पालघरमधील मतदान पार पडल्यानंतर जिल्हाधिकारी आणि निवडणूक अधिकारी प्रशांत नारनवरे यांनी सहा विधानसभा क्षेत्रातील सर्व मतदान केंद्र आणि बूथवरील माहिती गोळा केली. त्यानंतर एकूण 46.50 टक्के इतकं मतदान झाल्याचं जाहीर केलं.
मात्र दुसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवारी सकाळी अचानक पत्रक काढून हे मतदान 53.22 टक्क्यांवर गेल्याचं सांगण्यात आलं. मतदानाच्या आकडेवारीत फार फार तर 1 ते 2 टक्क्यांचा फरक पडू शकतो. मात्र ही सहा टक्के मतं एका रात्रीत कुठून वाढली? असा सवाल करत निवडणूक प्रक्रियेवर सेनेनं संशय व्यक्त केलाय.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram