मुंबई : अमित शाहांच्या स्वबळाच्या नाऱ्यावर संजय राऊतांची प्रतिक्रिया
Continues below advertisement
भाजपाध्यक्ष अमित शाह यांच्या स्वबळावर लढण्याच्या वक्तव्यावर शिवसेनेनं सावध भूमिका घेतली आहे. शाहांच्या वक्तव्याबाबत आम्हाला कोणतीही माहिती नाही असं वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. बंद दरवाजाच्या आड त्यांनी हे वक्तव्य केलं असावं. त्यामुळं याबाबत बोलणं उचित ठरणार नाही असं खासदार संजय राऊत यांनी म्हटलंय. उद्धव ठाकरे यांनी यापूर्वीच शिवसेना स्वबळावर लढेल अशी घोषणा केली होती. मात्र सेना भाजपची युती होणार का याबाबत संभ्रमाची भूमिका आहे.
Continues below advertisement