मुंबई | अटलबिहारी वाजपेयींच्या निधनावर संजय राऊतांचे प्रश्नचिन्ह
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या निधनाच्या तारखेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. वाजपेयी यांचे निधन 16 ऑगस्ट रोजी झाले की त्या दिवशी त्यांच्या निधनाची घोषणा केली असा प्रश्न संजय राऊतांनी शंका उपस्थित केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वातंत्र्य दिनाच्या भाषणावर कोणताही परिणाम होऊ नये म्हणून 16 ऑगस्टला वाजपेयी यांच्या निधनाची घोषणा केल्याचा दावा जय राऊतांनी केला आहे.