मुंबई : शनी शिंगणापूर आता सरकारी अधिपत्याखाली, संजय राऊतांची प्रतिक्रिया

Continues below advertisement
भक्तांच्या साडेसातीचं विघ्न हाटवणारा, अशी शनी शिंगणापूरच्या शनी देवाची ख्याती आहे. मात्र आता हे देवस्थान राज्य सरकारनं ताब्यात घेतलं आहे. कॅबिनेटच्या बैठकीत या निर्णयावर आज शिक्कामोर्तब झालं आहे. त्यामुळे अगामी काळात शनी देवावर राजकारण्यांचा  वरदहस्त राहणार आहे.

देवस्थानच्या कारभारावर भाजप आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्यासह अनेकांनी आक्षेप घेतला होता. त्याचबरोबर ग्रामसभेनं ठराव करुन विश्वस्त मंडळ बरखास्त करण्याची मागणीही केली होती. या प्रकरणी सरकारनं समिती गठीत केली होती. या समितीच्या अहवालानुसार देवस्थान ताब्यात घेण्याचा सरकारनं निर्णय घेतला आहे.

राज्य सरकारनं  राजकीय महत्वकांक्षेतून हा निर्णय घेतल्याची चर्चा आहे. देवस्थानवर राजकीय अंकुश राहणार असल्यानं विकास आणि पारदर्शक कारभाराकडं लक्ष असणार आहे. मात्र सरकारच्या या निर्णयानं गावकऱ्यांमध्ये ‘कही खुशी कही गम’ची भावना आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram