मुंबई: काँग्रेस कार्यालय तोडफोड: संजय निरुपम यांचा संताप
मनसेच्या भित्र्या, नपुंसक आणि भेकड कार्यकर्त्यांनी, कोणी नसल्याचं बघून आमच्या पक्ष कार्यालयाची तोडफोड केली. पोलीस स्टेशन 25 मीटर अंतरावर आहे, जर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कारवाई केली नाही तर आम्हीही चोख उत्तर देऊ, असा इशारा मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी दिला.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी आज सकाळी काँग्रेस कार्यालयाची तोडफोड केली. त्यानंतर संजय निरुपम चांगलेच आक्रमक झाले आहेत.