मुंबई : महिलांसाठी गुड न्यूज, सॅनिटरी पॅड जीएसटी कक्षेबाहेर, शालिनी ठाकरे यांची प्रतिक्रिया
Continues below advertisement
सॅनिटरी नॅफकिनला जीएसटीतून वगळण्याचा निर्णय जीएसटी कौन्सिलने घेतला आहे. महाराष्ट्र सरकारने यासंदर्भात जीएसटी कौन्सिलकडे मागणी केली होती. ती मागणी मान्य करण्यात आली आहे. त्यामुळे आता सॅनिटरी नॅपकिनच्या किंमती कमी होण्याची शक्यता आहे. सॅनिटरी नॅपकिनवर याआधी 12 टक्के जीएसटी आकारण्यात येत होता. मात्र आता जीएसटीच्या कक्षेबाहेर ठेवल्याने कोणत्याही प्रकारचा कर आकारला जाणार नाही. जीएसटी कौन्सिलची 28 वी बैठक पार पडली. 28 टक्क्यांच्या जीएसटी स्लॅबमधून अनेक वस्तूंना वगळण्यासह इतर अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत.
Continues below advertisement