मुंबई: सॅनिटरी नॅपकिन डिस्पोजल मशीनचं प्रात्यक्षिक
मुंबईतील सगळ्यात जुना होलिकोत्सव म्हणजे ताडदेव चिराबाजार.. यंदा उत्सवाचं 112 वं वर्ष होतं... दरवर्षी होळीच्या निमित्ताने एक सामाजिक संदेश दिला जातो.. यावर्षी सॅनिटरी नॅपकिन डिस्पोजल मशीनचं प्रात्यक्षिक देण्यात आलं... मुंबईत अनेक ठिकाणी पॅडमुळे पाणी तुंबण्याच्या घटना घडतात.. त्या ऐवजी पॅड डिसपोज केले तर प्रदूषण कमी होतं.. या मशीनमध्ये टाकलेले पॅड काही मिनिटात नष्ट होतात.. या मशीन इमारतीमध्ये लावण्यात यावा असा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांना देणार असल्याचं आयोजकांनी सांगितलं..