समृद्धी महामार्गाला बाळासाहेब ठाकरेंचं नाव द्या | शिवसेना | मुंबई | एबीपी माझा
समृद्धी महामार्गाला कोणाचे नाव द्यायचे यावरून शिवसेना आणि भाजपामध्ये जुंपण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रासाठी गेम चेंजर म्हणून दावा केला जाणाऱ्या या महामार्गाला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याची मागणी करून शिवसेनेनं टायमिंग साधलय. मंत्रिमंडळ बैठक संपल्यावर मुख्यमंत्री यांची भेट घेत मंत्री एकनाथ शिंदे आणि आमदारांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांना यासंदर्भात निवेदन दिलं.