मुंबई : पतंजली उत्पादनांची विक्री सरकारच्या सेवा केंद्रामार्फत, जिल्हाधिकाऱ्यांचं स्पष्टीकरण
योगगुरु रामदेव बाबांच्या पतंजलीचा राज्य सरकारला पुळका आलाय. कारण पतंजलीच्या उत्पादनांची विक्री राज्य सरकारच्या सेवा केंद्रांमार्फत होणार आहे.
आपले सरकार सेवा केंद्राच्या माध्यमातून सर्व सेवा एकाच ठिकाणी देण्याचा प्रयत्न केलाय.
राज्य सरकारच्या माहिती-तंत्रज्ञान विभागानं यासंबंधात याबाबतचे परिपत्रक काढलंय. दैनिक लोकसत्तानं यासंदर्भातलं वृत्त प्रकाशित केलंय.
सरकारनं या केंद्राच्या माध्यमातून ग्रामीण भागामध्ये तयार करण्यात येणाऱ्या उत्पादनांसह पतंजली कंपनीची उत्पादनंही उपलब्ध करण्याचा निर्णय घेतला आहे. परिपत्रकामध्ये विक्रीस ठेवण्यात येणाऱ्या उत्पादनांमध्ये पतंजलीच्या उत्पादनांशिवाय इतर एकाही खासगी उत्पादकाचा उल्लेख करण्यात आलेला नाही. त्यामुळे सरकारची पतंजलीवर मेहेरनजर का, असा प्रश्न उपस्थित होतोय.