मुंबई : कर्जाच्या सेटेलमेंटवरुन संभाजी निलंगेकर यांच्यावर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची टीका
Continues below advertisement
मंत्री संभाजी निलंगेकरांवर महाराष्ट्र बँक आणि युनियन बँक का मेहेरबान? असा प्रश्न एबीपी माझानं विचारला होता. निलंगेकर जामीनदार असलेल्या व्हिक्टोरिया अॅग्रो फूड प्रोसेसिंग कंपनीला महाराष्ट्र बँक आणि युनियन बँकेने कर्ज दिलं. मात्र, बँकेला 76 कोटी 90 लाखांची रक्कम परत करायची असतानाही त्यातील 25 कोटी 50 लाखांना दोन्ही बँकांमध्ये सेटलमेंट झाल्याचं समोर आलं. माझाने यासंदर्भातील बातमी दाखवल्यानंतर विरोधकांनीही निलंगेकरांवर चांगलंच तोंडसुख घेतलं आहे.
Continues below advertisement