एल्गार मोर्चा मुंबई: संभाजी भिडेंच्या अटकेचा मुद्दा विधीमंडळात गाजला
संभाजी भिडेंच्या अटकेचा मुद्दा विधानसभा आणि विधानपरिषदेतही चांगलाच तापलेला पाहायला मिळाला. विधानसभेत विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी संभाजी भिडेंच्या अटकेबाबत स्थगन प्रस्ताव मांडला. तर जितेंद्र आव्हाड यांनीही संभाजी भिडे आणि सरकारवर कडक शब्दात टीका केली.