मुंबई : 'पवारांचं जातीय राजकारण', 'सामना'तून शिवसेनेचे बाण
Continues below advertisement
आज विविध समाजघटकांकडून आरक्षणासाठी आंदोलने होत असली तरी जातीच्या निकषावर नव्हे तर आर्थिक निकषावरच आरक्षण द्यायला हवे!’ पवार यांनी मांडलेली भूमिका ही फक्त टाळ्य़ा मिळविण्यासाठीच असावी. पण या भूमिकेवर त्यांना टाळ्य़ा मिळण्याची शक्यता नाही. टाळी देण्यासाठी जो दुसरा हात लागतो तो त्यांच्या आसपासही दिसत नाही. कारण स्वतः शरद पवार हे देशातले ज्येष्ठ नेते असले तरी राजकारणातील त्यांच्या भूमिकांना कधीच स्थैर्य मिळाले नाही व जातीच्या राजकारणास पाठबळ देणाऱया भूमिका ते घेत राहिले.
Continues below advertisement