मुंबई : पाकिस्ताननं भारतीय न्यायव्यवस्थेबाबत बोलू नये : अबू आझमी

Continues below advertisement
काळवीट शिकारप्रकरणी 5 वर्षांची शिक्षा झालेला अभिनेता सलमान खानचा कळवळा आता पाकिस्तानलाही आला आहे. सलमान मुसलमान असल्यानेच त्याला 5 वर्षांची कठोर शिक्षा देण्यात आल्याची मुक्ताफळे पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री ख्वाजा आसिफ यांनी उधळली आहेत. पाकिस्तानच्या 'जियो न्यूज चॅनेल'ला दिलेल्या एका मुलाखतीत ख्वाजा आसिफ यांनी सलमानच्या शिक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. भारतात मुसलमान आणि दलितांना काहीही किंमत नाही असं म्हणत त्यांनी सलमान प्रकरणाला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न केला आहे. दरम्यान, भारताऐवजी स्वतःच्या देशातल्या दुर्दशेकडे  लक्ष द्या, असं उत्तर भाजपच्या मुख्तार अब्बास नक्वी यांनी दिलंय. 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram