मुंबई : गुरुपौर्णिमेला सचिन आचरेकर सरांसमोर नतमस्तक
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
27 Jul 2018 10:18 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं गुरुपौर्णिमेच्या दिवशी आचरेकर सरांची भेट घेतली. यावेळी सचिननं आचरेकर सरांसमोर नतमस्तक होऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. आपल्या भेटीचे फोटो सचिनने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केले आहेत. त्यासोबतच 'सर, तुमच्यामुळे हे सर्व शक्य झालं. तुमच्या मार्गदर्शनाशिवाय मी इतका मोठा पल्ला गाठूच शकलो नसतो, अशा आशयाचं ट्विट करत सचिनने आपल्या चाहत्यांनाही गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी सचिनसह त्याचा मित्र अतुल रानडेही उपस्थित होता.