मुंबई : 'स्वच्छता ही सेवा' अभियानात सचिनचा सहभाग, वांद्र्यात साफसफाई

Continues below advertisement
मुंबईतल्या वांद्रे बँडस्टँड परिसरात सचिन तेंडुलकर सकाळी आपल्या घरासमोर सफाई केली. त्यावेळी त्याच्यासोबत मुलगा अर्जुन तेंडुलकर आणि युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरेही होते. स्वच्छता ही सेवा अभियानाअंतर्गत या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. सकाळी सहा वाजता या सर्वांनी स्वच्छता अभियानाला सुरुवात केली. 15 सप्टेंबरपासून स्वच्छता ही सेवा अभियानाला सुरुवात झाली आहे. महत्मा गांधींच्या जयंतीला म्हणजेच 2 ऑक्टोंबरपर्यंत हे अभियान सुरु राहिल.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram