मुंबई : मनसेतून बाहेर गेलेले सहाही नगरसेवक शिवसेनेतच, दिलीप लांडेंचा दावा
मनसेतून शिवसेनेत गेलेले सहाही नगरसेवक पुन्हा मनसेत जाण्याच्या चर्चा निव्वळ अफवा असल्याची माहिती मनसेतून शिवसेनेत गेलेल्या दिलीप लांडे यांनी दिली आहे. मुद्दामहून अशा अफवा पसरवल्या जात असल्या, तरी आम्ही शिवसेनेतच राहू, असंही त्यांनी म्हटलं आहे. मनसेतून बाहेर पडून सेनेत गेलेले नगरसेवक पुन्हा मनसेत येण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चा सुरु आहेत. मात्र अशी कोणतीही शक्यतादिलीप लांडे यांनी नाकारली आहे.