मुंबई: राज्याच्या तिजोरीतून विनायक मेटेंसाठी 20 लाखाची कार!
राज्याच्या तिजोरीत खडखडाट असतांना छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समितीच्या वापराकरिता 20 लाखाची नवीन कार खरेदी करण्याचं मंजूर करण्यात आलंय. समितीचे अध्यक्ष विनायक मेटे यांच्या दिमतीला एक आलिशान कार शासकीय खर्चाने उपलब्ध करून दिली जाणार आहे. यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने हिरवा कंदील दिला असून यासांदर्भात शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.