मुंबई : रस्ते घोटाळ्यातील कंत्राटदारावर महापालिका मेहरबान?

Continues below advertisement
मुंबईतील रस्ते घोटाळा चांगलाच गाजला. त्यावर सत्ताधारी आणि विरोधीपक्षांत आरोप प्रत्यारोपांच्या फैरीही झडल्या. आणि काही कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांवर कारवाईही करण्यात आली. मात्र, हा सर्व प्रकार महापालिका विसरली आहे की त्याकडे कानाडोला करण्यात येत आहे, असा प्रश्न विचारण्याची वेळ आता आली आहे. कारण, रस्ते घोटाळ्यात ज्या कंत्राटदारांवर कारवाई करण्यात आली होती. त्यात आर. ई. इन्फ्रास्ट्रक्चर या कंत्राटदार कंपनीचाही समावेश होता. मात्र, आता या घोटाळेबाज कंत्राटदाराच्या पत्नीच्या नावे असलेल्या मेसर्स फोर्सला मुंबईतील महत्वाच्या रस्तांची कामं सोपवली जात आहेत. 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram