भिवंडी: रोड रोमियोला महिलांनी चपलेने चोपलं
Continues below advertisement
भर बाजारात महिलेची छेड काढणाऱ्या एका रोमिओची चांगलीच धुलाई करण्यात आली. भिवंडीतील तीन बत्ती परिसरातल्या भाजी मंडईत भाजीपाला खरेदीसाठी एक महिला आली होती. त्यावेळी या सडक छाप रोमिओने तिची रस्त्यातच छेड काढली. त्यामुळे संतप्त झालेल्या महिलेने त्याला तिथेच चपलीने मारण्यास सुरुवात केली. हे बघून इतरही काही महिलांनी मदतीला धावत त्याला चोप दिला. महिलांचं धाडस बघून छेडछाड करणाऱ्या तरुणानेही पळ काढला. पण या सगळ्या घटनेचा व्हीडिओ व्हायरल झालाय.
Continues below advertisement