मुंबई : नाणार प्रकल्प महाराष्ट्रात येणं भाग्याची गोष्ट : मुख्यमंत्री
Continues below advertisement
नाणार प्रकल्प महाराष्ट्रात येणं ही भाग्याची गोष्ट आहे. काहींचा या प्रकल्पाला विरोध होत आहे, मात्र हा विरोध चर्चेने सोडवू, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. ते मुंबईत बोलत होते.
“मी केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचे आभार मानतो. सगळ्यात मोठी रिफायनरी महाराष्ट्रात आणत आहेत. या प्रकल्पामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होईल. मला वाटते नाणार रिफाईनरी होणे हे महाराष्ट्राचे भाग्य आहे. काही लोक या प्रकल्पाला विरोध करत आहेत, पण तो विरोध चर्चा करून सोडवू, संघर्ष नाही तर संवादाच्या माध्यमातून विषय संपवावे ही आमची भूमिका आहे”, असं मुख्यमंत्री म्हणाले.